मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे आजी – आजोबा दिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. चंद्रकांत पेडणेकर व सौ.पेडणेकर यांनी भूषविले. पालक शिक्षक संघ सदस्या सौ.शर्मिला आसोलकर तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीताने करण्यात आली.त्यानंतर आजोबाआजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लहान मुलांनी आपल्या नृत्याने तसेच सुंदर अशा नाटिकेने सादर केले.आजी आजोबांचे स्थान मुलांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.शाळेतील सहाय्यक शिक्षिका श्रीम.विरजींन फर्नांडिस यांनी आजी-आजोबांबद्दल सुंदर विचार मांडले.सर्व आजीआजोबांचे प्रतिनिधित्व करणारे श्री.चंद्रकांत पेडणेकर यांनी सर्वांशी आपल्या आयुष्यातील काही आठवणी सांगितल्या सर्व आजी आजोबांना त्यांच्या आयुष्यातले चांगले वाईट प्रसंग आठवणीत आणून दिले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी शाळेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थी वेदांत आसोलकर व कुमारी गार्गी गावडे यांनी केले.तर सर्वांचे आभार सहा. शिक्षिका ग्लॅग्निस पिंटो यांनी मानले.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सहा. शिक्षिका निधी तांडेल यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन केली. संस्थेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोझा, शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.कस्तुरी तूळसकर हिने सुरुवातीला सुमधूर गायनाने सर्व गुरूंना ‘गुरुवंदना’ दिली. यानंतर शाळेचे सहा.शिक्षक सतीश वारंग यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगताना, गुरुचे आपल्या आयुष्यातील स्थान व महत्त्व, पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुशिष्यांच्या जोड्या याविषयी माहिती दिली.कु. विजय तुळसकर, कु. यशिता जाधव यांनीही गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली.
यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तालुकास्तरावर खेळांमध्ये विजयी झालेली कु.जान्हवी मडकईकर हिला भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच तालुकास्तरातील इतर खेळांमध्ये कु. लक्ष्मण कोंडुरकर, कु. मितेश मयेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले. इयत्ता सहावीतील कु. काव्या प्रदीप सामंत हिने मुंबई येथे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले. कु. इशिता फर्नांडिस हिने कुडाळ रोटरी क्लब मॅरेथॉन 5 किमी मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. या दोघांचेही शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं यश हेच या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना दिलेली गुरुदक्षिणा होती.
तसेच यावेळी शाळेला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास नेफडो या संस्थेमार्फत संस्थेच्या सिंधुदुर्ग महिला अध्यक्षा व प्रशालेच्या सहा.शिक्षिका पूजा गावडे यांस कडून वृक्ष वाटप करण्यात आले. “निसर्गाचे जतन करा, पर्यावरण वाचवा”, “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका निधी तांडेल यांनी केले व आभार मानले.
Yoga Day : World International Yoga day was celebrated on 21st June 2024 in Mother Teresa School, Vengurla. Miss Sanskriti Manjrekar the ex-student of the school guided all the students with the expertice and experience.
Welcoming the students: Mother Teresa School, Vengurla re-opened on 10th June 2024 Fr. Felix Lobo, the Principal of the school welcomed all the students and teachers. All the newcomers were warmly greeted with a token of small gift.
प्रिय पालक
आपणा सर्वांस ऐकून खूप आनंद आणि अभिमान वाटेल की, आपल्या शाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आहे . स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सर्वच विभागांमध्ये आपल्या मदर तेरेसा स्कूलने प्रथम स्थान *पटकावले आहे . 🏤🏆🏆🥁
आपण सर्वजण या परिवाराचे सदस्य असल्याने आणि शाळेच्या प्रगतीत आपला मोलाचा हात असल्यामुळे आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या प्रशालेला परमेश्वर नेहमी असेच आशिर्वादित करुन यशस्वी करो ही सदिच्छा 🎊🙏
मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी भाषा दिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.प्राथनेने कार्यक्रमाची सुरवात कु. मानसी बांदेकर हिने केली.ग्रिष्मा व हर्षाली हिने कुसुमाग्रज यांच्या विषयी भाषण दिले. मराठी भाषा दिना विषयी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने भाषण दिले.मराठी भाषेचा संतांनी आपल्या अभंगातून प्रसार केला. त्याचे औचित्य साधून प्रशालेतील चिन्मय, वेदांत, हर्षाली ह्या मुलांनी विविध संतांचे अभंग म्हंटले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नीरजा माडकर हिने अप्रतिम नृत्य सादर केले. सोहम पेडणेकर व दाभोलकर या दोघांनी पकवाद वादनाचे प्रात्यशिक सादर केले. विजय तुळसकर व कस्तुरी तुळसकर ह्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम गीत सादर केले. तसेच आपली बोली भाषा असलेली मालवणी व कोंकणी भाषेत मुलांनी नाटक सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समुह गीत सादर केले.नववीच्या मुलींनी सुंदर रांगोळ्या शाळेच्या आवारात कडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षणा नाबर व एल्विरा रॉड्रिग्ज हिने केले. आभार प्रदर्शन सौ. विर्जिन फर्नांडिस यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री संदेश रेडकर सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर आंतोन डिसोजा यांनी मुलांनी केलेल्या या कार्यक्रमाचे अभिनंदन केलें व मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भदय तेयेवा ळाऱेत ळुक्रलाय ददनांक 8.एप्रप्रर.२०२२ योजी वंध्माकाऱी ६.०० लाजता सवसनमय के जी चा ऩदलीदान वभायंब भोठ्मा उत्वाशात ऩाय ऩाडण्मात आरा. मा वभायंबात प्रभुख ऩाशुणे म्शणून भाननीम पादय कॅ जीटन यॉड्रीक्व आणण डॉक्टय. वौ. वई सरंगलत, तवेच ळाऱेचे
म्मानेजय भा. पादय आंद्रूदडभेरो आणण प्रळारेचे भुख्माध्माऩक भा. पादय आंतोन दडवोजा, ल ऩारक प्रतीसनधी भधून अऩणाा शऱदणकय, ल वौ. आयती तेयेखोरकय मांच्मा शस्ते ददऩ प्रज्लरन
कयण्मात आरे.
ळाऱेतीर इमत्ता वातलीची प्रलद्यासथानी कु . भानवी फांदेकय दशने थानागीत गासमरे.ल कामाक्रभची वुरुलात के री. ळाऱेतीर Nursery, Sr.K.G, Jr. K.G, मा लगाातीर भुरांच्मा शस्ते प्रभुख ऩाशुण्मांचे ऩुष्ऩगुच्छ देऊन स्लागत कयण्मात आरे. भुरांनी स्लागत नृत्म वादय के रे. नवायी, ज्मुसनअय के जी , सवसनमय के जी आणण इमत्ता ऩदशरीच्मा प्रलद्यार्थमाांनी प्रलप्रलध वांस्कृ सतक ल ळैषणणक करागुण वादय के रे. डॉ. वई सरंगलत ल भा. पादय कॅ जीटन यॉड्रीक्व मांनी आऩल्मा बाऴणातून ऩारकांना चांगल्मा प्रकाये भागादळान के
भुरांना प्रभुख ऩाशुणाच्मा शस्ते ऩदली प्रभाणऩत्र प्रदान कयण्मात आरे. प्रळारेचे भुख्माध्माऩक भा. पादय आंतोन दडवोजा मांनी भुराचे असबनंदन के रे. ळाऱेतीर ईमत्ता.वातली तीर प्रलद्यासथानी कु भायी . गागी गालडे दशने आबाय व्मक्त के र
अश्मा प्रकाये ऩदली ददनाचा कामाक्रभ आनंदात ल उत्वाशात ऩाय ऩडरा.